स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर प्रयत्नाची पराकाष्टा करा. विजय भातखंडे
नंदगाव सकाळ वृत्तसेवा दि .७
स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर प्रयत्नांची पराकाष्टा करा यासाठी बँक ऑफ इंडिया नेहमी तुमच्या सोबत राहील. असे बँक ऑफ इंडिया झोनल ऑफिस कोल्हापूरचे मुख्य प्रबंधक श्री विजय भातखंडे यांनी एम.एम. शेख फाउंडेशन व सहारा एजन्सी यांचे मार्फत बँक ऑफ इंडिया च्या ११७ व्या वर्धापन दिनानिमित्त माधामिक विदया लय नागाव ता. करवीर येथे गरिब व गरजू विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वाटप व एन.एम.एम. एस व सारथी शिष्यवृत्ती परीक्षेत पास झालेल्या २५ विद्यार्थ्यांचा सत्काराच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले.
तसेच माध्यमिक विद्यालय नागावचे मुख्याध्यापक श्री.रंगराव तोरस्कर यांना एम.एम. शेख फाउंडेशन तर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला . यावेळी बँक ऑफ इंडिया चुये शाखेचे बँक मित्र राजू तोरस्कर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राजू तोरस्कर यांनी बँकेच्या कामाविषयी व सचिन चौगले यांनी सहारा एजन्सीच्या कामाबद्दल माहिती सांगितली
यावेळी सारा एजन्सी चे शमशुद्दीन जमादार, जयकुमार मोरे ,दिलीप चौगले ,सचिन चौगले शिक्षक स्टाफ, ग्रामस्थ , पालक व विद्यार्थी उपस्थित होते. स्वागत बाळासाहेब संकपाळ ,प्रास्ताविक अरविंद मगदूम व आभार प्रकाश खोत यांनी केले.